Sheet1 कृष्णमुर्ती पद्धत : सर्वप्रथम पत्रिका कृष्णमुर्ती पद्धतीने तयार केलेली असावी ह्या पद्धती प्रमाणे विवाहाच्या प्रश्नासाठी सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बघतात . ह्या पद्धती प्रमाणे विवाहासाठीचा नियम असा कि "जर जन्मपत्रिकेनुसार सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी द्वितीय , सप्तम व लाभ ह्यापेकी किमान एका स्थानाचा कार्येश असून षष्ठ स्थानाचा एकमेव कार्येश नसेल तर २,७,११ ह्या स्थानाच्या दशेत/ अंतर्दशेत विवाह होतो . " प्रथम स्थान : ह्या स्थानावरून साधारणपणे शारीरिक ठेवण ( physical chracteristics ),व्यक्तिमत्व कळते.तसेच life span बघताना पण प्रथम स्थान तसेच प्रथमेश महत्वाचा असतो. शरीरातील भाग : डोके , मेंदू,सर्वसाधारण प्रकृती इ. द्वितीय स्थान : हे एक महत्वाचे धन स्थान(आर्थिक स्थिती ) आहे . तसेच कुटुंब स्थान आहे . शरीरातील भाग : उजवा डोळा , घसा , वाणी, इ. तृतीय स्थान : ह्या स्थानावरून साधारणपणे भावंडाचा विचार करतात . तसेच लहान प्रवास , हस्ताक्षर,कागद पत्रे इ. शरीरातील भाग : कान , हात ,इ. चतुर्थ स्थान : ह्या स्थानावरून साधारणपणे मातृसौख्याचा विचार . तसेच घर , जमीन , वाहन इ. शरीरातील भाग : हृदय , छाती इ. पंचम स्थान : ह्या स्थानावरून साधारणपणे संतती , कला , खेळ , उपासना ,काही investments इ. चा विचारा करतात . तसेच हे प्रणय स्थान पण आहे . प्रेम विवाह असेल तर पंचम व सप्तम यात संबंध असतो . शरीरातील भाग : पोटावरचा भाग , स्मृती( memory ), पोटाच्या वरचा भाग , षष्ठ स्थान : ह्या स्थानावरून साधारणपणे आपल्याला होणारे आजार तसेच मातुल घराणे ( मामा ,मावशी इ. ) , हाताखाली काम करणारी माणसे इ. चा विचार करतात. हे पण एक धन स्थान आहे . शरीरातील भाग : पोटाखालचा भाग ( ओटीपोट) ,आतडी इ. सप्तम स्थान : ह्या स्थानावरून साधारणपणे कायदेशीर जोडीदार ( पती / पत्नी ). व्यवसायातील जोडीदार ह्याचा विचार होतो . शरीरातील भाग : कंबर, मूत्रपिंड , इ. अष्टम स्थान : ह्या स्थानावरून साधारणपणे आयुर्मान , मृत्यू कसा होईल ह्याचा अंदाज , मानसिक त्रास, अचानक धनलाभ इ. चा विचार करतात शरीरातील भाग : reproductive oragans , blood इ. नवम स्थान : ह्याला भाग्य स्थान म्हणतात . दूरचे प्रवास , अध्यात्मिक कल , नावलौकिक , उच्च शिक्षण, आधीच्या पिढ्या इ. चा विचार करतात . शरीरातील भाग : मंड्या दशम स्थान : ह्या स्थानावरून साधारणपणे करियर,मानसन्मान,पितृ सौख्य (पारंपारिक ज्योतिषानुसार पितृ सौख्याचा विचार ह्या दशम स्थानावरून करतात .पण कृष्णमुर्ती पद्धती नुसार पित्यासंबंधी विचार नवम स्थानावरून केला आहे ) शरीरातील भाग : गुढगे एकादश /लाभ स्थान : ह्या स्थानावरून साधारणपणे मोठे भावंड ,सर्वप्रकारचे लाभ ,मित्र परिवार इ. गोष्टींचा विचार करतात . शरीरातील भाग :पोटऱ्या द्वादश/व्यय स्थान : ह्या स्थानावरून साधारणपणे नुकसान , परदेशगमन , hospitalization इ. विचार करतात . शरीरातील भाग : पावले ,डावा डोळा मराठी मध्ये सुद्धा बर्याच लोकांनी ह्या पद्धती वरील बरीच पुस्तके लिहिली आहेत . त्यापेकी काही खाली देत आहे. १.कृष्णमुर्ती ज्योतिष रहस्य -------------------------- सुरेश शहासने २. कृष्णमुर्ती ज्योतिष वेद ------------------ -----------सुरेश शहासने ३. कृष्णमुर्ती सिद्धांत ------------------------ ----------ज्योतिन्द्र हसबे ४. वेध नक्षत्रांचा ---------------------------------------ज्योतिन्द्र हसबे ५. कृष्णमुर्ती प्रश्न सिद्धांत भाग १---------------------- ज्योतिन्द्र हसबे ६. कृष्णमुर्ती प्रश्न सिद्धांत भाग २---------------------- ज्योतिन्द्र हसबे ७. उपनक्षत्र स्वामींची किमया ---------------------------सुनिल देव ८. दशमस्थान ---------------------------------------------सुनिल देव ९. षष्ठ स्थान ------------------------------------- --------सुनिल देव हरवलेली वस्तू परत मिळेल का? हा प्रश्न बघताना , जर लाभस्थानाचा उपनक्षत्र स्वामी मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून जर हरवलेली वस्तू ज्या भावावरून बघतात त्या भावाचा कार्येश असेल व ती वस्तू ज्या भावावरून बघतात त्या भावाचा उपनक्षत्र स्वामी जर लाभ स्थानाचा कार्येश असेल तर तर ती वस्तू परत मिळते . उदा . द्वितीय स्थानावरून हरवलेले पैसे ,दागिने इ. बघतात . समजा पैसे हरवले असतील तर द्वितीय भावाचा उपनक्षत्र स्वामी बघावा . तो जर मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून लाभ स्थानाचा कार्येश असेल व लाभस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर द्वितीय भावाचा कार्येश असेल तर पैसे नक्की मिळतील . जन्मपत्रिके करता संतति संबधी नियम असा आहे कि '' पंचम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर द्वितीय ( कुटुंब स्थान ) , पंचम स्थान ( संतति स्थान ) किंवा लाभ स्थान ( सर्व प्रकारचे लाभ ) ह्यापेकी एकाचा जरी कार्येश असेल तर संतति योग असतो . ' प्रश्नकुंडली करता संतति संबधी नियम असा आहे कि , '' पंचम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर द्वितीय ( कुटुंब स्थान ) , पंचम स्थान ( संतति स्थान ) किंवा लाभ स्थान ( सर्व प्रकारचे लाभ ) ह्यापेकी एकाचा जरी कार्येश असेल व तो उपनक्षत्र स्वामी जर मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर संतति योग असतो . ' आता संतति योग आहे ह्याची खात्री झाल्यावर मग कधी? त्यासाठी महादशा स्वामी बघावा . महादशा स्वामी जर २,५,११ ह्या पेकी भावांचा कार्येश असेल व चतुर्थ स्थानाचा बलवान कार्येश नसेल तर त्या महादशेत संततियोग असतो . महादशा स्वामी जर अनुकूल असेल तर मग अंतर्दशा स्वामी बघावा तो सुद्धा जर २,५,११ह्या पेकी भावांचा कार्येश असेल व चतुर्थ स्थानाचा बलवान कार्येश नसेल तर ती अंतर्दशा निवडावी . तसेच विदशा पण त्याच नियमाने ठरवावी . अशा प्रकारे साधारण काळ काढता ये प्रश्नकुंडली मध्ये नियमाप्रमाणे जर योग असेल तर महदशा व अंतर्दशा ठरवताना . बाकी नियामाबरोबर अजून एक नियम म्हणजे वक्री ग्रहांच्या नक्षत्रात असलेला महादशा स्वामी फळ देत नाही . तसेच महादशा/ अन्तर्दशा स्वामी मार्गी असून स्वत: वक्री असेल तर तो मार्गी झाल्यानंतर फळ देतो . पारंपारिक पद्धत : पंचम स्थानावर मुख्यत्वे संतति / उपासना /कला/ क्रीडा(खेळ) / investment इ . गोष्टी बघतात . त्यापेकी ह्या लेखात आपण फक्त संतति विषयाचाच विचार करू . संतति योग आहे का ? असेल तर केव्हा ? इ. सर्व गोष्टींचा विचार ह्या स्थानावरून करतात . संतति संबंधी विचार करताना पंचम स्थान , पंचमेश ( पंचम स्थानाचा अधिपती ) तसेच संतति चा कारक ग्रह म्हणून 'गुरु' तसेच पंचमावर व पंचमेशावर दृष्टी असणारे ग्रह ह्या सर्वांचा विचार करायला हवा . पंचमात पापग्रह असणे ( पंचमातील शनि बर्याच वेळेस मुल होण्याच्या दृष्टीने विलंब लावतो )तसेच पंचमेश बिघडलेला असणे म्हणजे पंचमेश शत्रू राशीत असणे , त्याचा कोणत्याही एक किंवा त्याहून अधिक ग्रहाशी कुयोग असणे . पंचमेश अष्टमाच्या युतीत असणे ,पंचमेश वक्री असणे इ. गुरु हा संतति चा कारक ग्रह जर पत्रिकेत नीच राशीत पापग्रहाच्या कुयोगात असेल किंवा वक्री असेल तसेच गुरु पाप ग्रहाच्या युतीत असेल तर संतती सुखाच्या दृष्टीने चांगले नाही . गुरु- राहू युती सुद्धा संतति सुखाच्या दृष्टीने वाईटच असते . तसेच पत्रिकेतील महादशेचा पण विचार करणे क्रमप्राप्त आहे . जर महादशा संतति होण्याच्या दृष्टीने supporting नसतील तर मग योग्य महादशा येई पर्यंत वाट बघणे आपल्या हातात असते . इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का? ह्या प्रश्नासाठी नियम असा आहे कि ' सप्तमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर स्थिर राशीत असून २,७,११ चा कार्येश असेल तर इच्छित व्यक्तीशी विवाह होईल . ' तसेच तो उपनक्षत्र स्वामी वक्री किंवा वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा . सप्तमस्थान- भाग २(घटस्फोट) घटस्फोटाचे योग बघताना मुख्यत्वे सप्तम स्थान , सप्तमेश तसेच विवाहाचा कारक ग्रह शुक्र तसेच येणाऱ्या महादशा या सर्वाचा विचार करावा लागतो . बर्याच वेळा सप्तमात पापग्रह असणे , सप्तमेश वक्री असून त्याचे पापाग्रहाशी कुयोग असणे इ . कारणे असतात. बर्याच पत्रिकामध्ये शुक्राचा हर्षल, शनि , मंगल ,नेपचून ह्या ग्रहाशी प्रतियोग , षडाष्टक किंवा केंद्रयोग असतो. तसेच काही वेळेस शुक्र राहू युती पण असते . कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे घटस्फोट होण्यासाठी महादशा स्वामी बघावा लागतो. तो जर सहा किंवा बारा भावांचा बलवान कार्येश असून तृतीय भावाचा पण कार्येश असेल तर कायदेशीर विवाह विच्छेद म्हणजे ' घटस्फोट ' होतो . जर तृतीय स्थानाशी संबंध आला नाही तर मग बहुतेक वेळा वैवाहिक सौख्य मनासारखे न मिळणे , एकमेकांपासून लांब राहणे इ. गोष्टी होतात . बऱ्याच वेळा विचार केल्यावर असे वाटते कि आधीच्या काळी पण असे ग्रहयोग लोंकाच्या पत्रिकेत असणार पण त्याकाळी घटस्फोटाचे प्रमाण खूप कमी होते. आत्ता ते खूप वाढले आहे. त्याची बरीच कारणे आहेत जसे कि आधीची पिढी सोशिक होती किंवा तेव्हाची स्त्री शिकलेली नव्हती त्यामुळे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नव्हती इ. पण प्रश्न असा आहे कि आत्ता सुद्धा बरेच जण घटस्फोट घेऊन सुखी होतात का? आता ते कोणत्या कारणाने घटस्फोट घेत आहेत त्यावर अवलंबून आहे ( काही जनाच्या बाबतीत खरेच लग्न टिकवून ठेवणे हे त्रासदायक असते ) पण नुसते पटत नाही म्हणून घटस्फोट घेणे योग्य आहे का ? विशेषत: मुले असताना . जास्तीत जास्त जोडीदाराला समजून घेऊन नाते टिकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवा . अर्थात दोघांकडून हे महत्वाचे . " मी नोकरी करणे चांगले कि व्यवसाय ?" . "दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर कोणत्याही प्रकारे सप्तमाचा बलवान कार्येश असेल व चर राशीत असेल तर ती व्यक्ती व्यवसाय करेल . जर दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी षष्ठ स्थानाचा कार्येश असेल तर ती व्यक्ती नोकरी करेल. " दशमाचा उपनक्षत्र स्वामी जर २,६,७,१०,११ ह्या भावाचा बलवान कार्येश असेल तर व्यवसायात चांगले यश मिळते . साधारणपणे जर ५,९,८ ह्या स्थानाच्या दशा असतील तर नोकरी/ व्यवसायात अडचणी येतात . बहुतेक वेळा जर दशा/ अंतर्दशा अष्टम स्थानाचे फळ दाखवत असेल तर मनस्ताप पण होतो. त्यामुळे ह्या काळात नोकरी बदलू नये . साधारणपणे २,३,६,१०,११ ह्या स्थानाच्या दशा असतील तर नोकरी/ व्यवसायात चांगली प्रगती होते .जो/जे ग्रह दशम स्थानाचे बलवान कार्येश असतात त्या ग्रहाच्या दशा/ अंतर्दशा नोकरीत प्रमोशन / व्यवसायात प्रगती दाखवतात. माझ्यामते मी दशमस्थानाबाबत थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जाणकारांनी अजून आपली मते व अनुभव मांडावेत . Sheet2 राशी व पत्रिकेतील भाव ह्यानुसार आजार जेव्हा पत्रिकेतून आपल्याला होणार्या संभाव्य आजारांचे अनुमान केले जाते तेव्हा १, ५,६,८, ११ ,१२ ह्या सर्व भावांचा विचार प्रामुख्याने करावा लागतो म्हणजे ह्या भावात असणारे ग्रह , राशी त्या त्या भावांचे उपनक्षत्र स्वामी .आता जेव्हा हे analysis करायचे तेव्हा प्रत्येक ग्रहानुसार राशीनुसार तसेच नक्षत्र परत्वे कोण कोणत्या आजाराची शक्यता असते हे माहिती असणे आवश्यक आहे . सर्वप्रथम आपण प्रत्येक राशीच्या अमलाखाली कोणते अवयव व आजार येतात ते बघुयात . मेष रास : डोके , मेंदू ( प्रथम स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात ) आजार : मेंदू किंवा डोक्यासाबंधी आजार , मेष हि मंगळाची रास असल्याने उष्णता विकार इ. वृषभ रास : घसा , दात , डोळा , मान ( द्वितीय स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात.) आजार : आवाजाशी सबंधित विकार , टोन्सिल्स , दातांचे विकार, कफ तसेच वृषभ हि शुक्राची रास असल्याने व निसर्ग कुंडलीत द्वितीय स्थानी असल्याने अयोग्य आहारावरून होणारे विकार इ. मिथुन रास : कान , nervous system , हात (तृतीय स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) आजार : वायुमुळे होणारे विकार , मज्जातंतू विषयीचे विकार ( nervous system ) इ. कर्क रास : छाती , मन, शरीरातील द्रव पदार्थ किंवा पाचक रस (चतुर्थ स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) आजार : फुफुसासाबंधी आजार , शरीरातील द्रव पदार्थ , सर्दी इ. सिंह रास : heart , पाठ , पाठीचा कणा (पंचम स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) आजार : heart attack , पाठीच्या कण्या सबंधित आजार इ. कन्या : पोट , पचन संस्था , मज्जासंस्था ( षष्ठ स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) आजार : पचनासबंधी आजार ,acidity ( विशेषत: कन्या राशीत मंगळ असेल तर ) तूळ रास : किडनी , कंबर ,गर्भाशय (सप्तम स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) आजार संदर्भात आजार वृश्चिक रास :reproductive oragans . ( अष्टम स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) आजार : किडनी स्टोन , गुदद्वार व वरील सबंधी आजार धनु रास : मांड्या , बरगड्या इ. (नवम स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) आजार : वरील संबंधी आजार मकर रास : गुढगे , हाडे , सांधे इ. (दशम स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) आजार : त्वचा विकार , डिप्रेशन तसेच वरील संबंधी आजार कुंभ रास : दात , रक्ताभिसरण ,पोटऱ्या (एकादश स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) आजार : वरील संबंधी आजार मीन रास : पावले , पायाची बोटे ,डावा डोळा ( व्यय स्थानावरून सुद्धा हीच अनुमाने काढता येतात) आजार : वरील संबंधी आजार पुढील भागात आपण प्रत्येक ग्रहांवरून होणारे आजार बघुयात . ह्यावरून तुम्हाला समजले असेल कि ज्योतिषशास्त्राचा योग्य उपयोग हा काळजी वाढवण्यासाठी नसून काळजी घेण्यासाठी आहे . शिक्षण आणि पत्रिका भाग -३ मागील लेखात आपण रवि , चंद्र , मंगळ ह्या ग्रहांशी सबंधित शिक्षण क्षेत्रातील माहिती घेतली ह्या लेखात पुढील ग्रहांबद्दल माहिती बघुयात . मागील लेखात म्हंटल्या प्रमाणे शिक्षण शाखा ठरवताना चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी महत्वाचा ठरतो . जर चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी शुक्र असेल किंवा शुक्राच्या नक्षत्रात असेल तर साधारण पण शुक्राशी सबंधित शिक्षण घेतले जाते . शुक्रावरून कला म्हणजे गायन , नृत्य ,चित्रकला , भरतकाम , शिवण कला ह्याचाविचार केला जातो . तसेच वाहन ( गाड्या) , खाण्याचे पदार्थ , आर्किटेक्ट , सौदर्य प्रसाधने ,fashion designing ह्या क्षेत्रांचा पण विचार होतो . शुक्राबरोबर अजून कोणते ग्रह आहेत त्या नुसार क्षेत्रे ठरत असतात . उदा . शुक्र बरोबर जर बुध , चंद्र असतील व ३,५,७ ह्या भवांशी सबंध असेल तर textile designing ,शुक्र बरोबर जर बुध , राहू असतील व ५,३,८ ह्या भवांशी सबंध असेल तर फोटोग्राफी असे वर्गीकरण करता येते . जर चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी बुध असेल किंवा बुधाच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे बुधाशी सबंधित शिक्षण घेतले जाते. बुधावरून गणित , तत्वज्ञान , भाषा , टूरिझम , पत्रकारिता , ज्योतिष , प्रकाशन , लेखन इ. क्षेत्रांचा अभ्यास केला जातो . बुधामुळे एका पेक्षा जास्त शाखेत प्राविण्य मिळण्याची पण शक्यता असते . बुधाबरोबर अजून कोणते ग्रह आहेत त्या नुसार क्षेत्रे ठरत असतात . उदा . बुधा बरोबर गुरु असेल व ३, ९ ह्या भावांशी सबंध असेल तर जाहिरात क्षेत्र , बुधा बरोबर शुक्र असेल व ३,१०,११ ह्या भावांशी सबंध असेल तर मार्केटिंग व सेल्स , बुधा बरोबर गुरु असेल व ४,९,११ ह्या भावांशी सबंध असेल तर शिक्षण क्षेत्र , बुधा बरोबर गुरु असेल व ३, ११,१२ ह्या भावांशी सबंध असेल तर परदेशी भाषा ह्या प्रमाणे अंदाज बांधता येतात . जर चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी गुरु असेल किंवा गुरूच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे गुरूशी सबंधित शिक्षण घेतले जाते . गुरूवरून कॉमर्स , बॅंकिंग , शिक्षणक्षेत्र ,धर्मशास्त्र , राजकारण , वेद व मंत्र शास्त्र इ. क्षेत्रांचा विचार होतो . गुरु बरोबर अजून कोणते ग्रह आहेत त्या नुसार क्षेत्रे ठरत असतात . उदा . गुरु बरोबर रवि व मंगळ असेल आणि ६,१०,११ ह्या भावांचा सबंध असेल तर राजकारण ,गुरु बरोबर बुध ,शुक्र असून २,३,७,९ ह्या भावांशी सबंध असेल तर सी . ए ( वाणिज्य शास्त्र ) , गुरु बरोबर शनि ,बुध असून ३,९,११,४ ह्या भावांशी संबंध असेल तर कॉम्पुटर सोफ्टवेअर इ. क्षेत्रांचा विचार करता येतो . जर चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी शनि असेल किंवा शनिच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे शनीशी सबंधित शिक्षण घेतले जाते .शनि वरून archaeology , engineering , ज्योतिष , तत्वज्ञान इ. गोष्टींचा अभ्यास केला जातो . शनी कोणत्या ग्रहाबरोबर आहे तसेच कोणत्या स्थानाशी सबंधित आहे त्यावरून अजून जास्त माहिती मिळू शकते . उदा . शनी , बुध , मंगळ व १, ८ हे भाव mechanical engg सुचवतात , शनी बरोबर शुक्र , मंगळ असल्यास व २,१,५,८ ह्या भावांशी सबंध असल्यास dentist हे क्षेत्र सुचवते . जर चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी राहू किंवा केतू असेल किंवा राहू , केतूच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे राहू ,केतू ज्या राशीत आहेत त्या राशीच्या राशीच्या अधिपातीप्रमाणे तसेच राहू केतू ज्यांच्या युतीत आहे व ज्या ग्रहांची दृष्टी त्यांच्यावर आहे त्या ग्रहांप्रमाणे त्याचे मूल्यमापन करावे . एकंदर शिक्षणाचा विचार पत्रिकेवरून करताना ४, ९,११ महत्वाची आहेत तसेच चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बघितला जातो. त्याचा ग्रहांशी तसेच स्थानाशी येणारा सबंध तसेच पुढे येणाऱ्या महादशा ह्या सर्व गोष्टींचा तारतम्याने विचार करावा लागतो. एक दिशा सापडण्यासाठी नक्कीच पत्रिकेचा उपयोग होऊ शकतो परंतु ज्योतिष हे एक तर्क शास्त्र आहे ह्याचे भान मात्र सदैव ठेवायला हवे . मागील लेखात आपण शिक्षण आणि पत्रिका ह्याबाबतीतला आढावा घेतला . ह्या लेखात ग्रह आणि भाव साधारण कोणती शिक्षण शाखा सुचवतात हे पाहू. कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी शिक्षणाकरता लक्षात घ्यावा लागतो . हा उपनक्षत्र स्वामी जर बुध किंवा गुरु शी सबंधित( बुध , गुरु असेल किंवा बुध - गुरु च्या नक्षत्रात असेल ) असेल तर शिक्षण चांगले होते . तसेच चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी ४, ९,११ ह्या भावांचा कार्येश असेल तर शिक्षण व्यवस्थित पूर्ण होते . अर्थात त्या काळात येणाऱ्या दशा सुद्धा ४,९, ११ हि स्थाने देणाऱ्या हव्यात त्या जर उलट्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या ३,८ स्थानाच्या असतील तर शिक्षणात अडचणी येतात . अडचणी येतात म्हणजे खूप मेहनत करावी लागते सहज यश मिळत नाही . आता चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी कोणता ग्रह आहे व तो कोणत्या ग्रहाच्या नक्षत्रात आहे ते बघावे तसेच कोणकोणत्या भावांचा कार्येश आहे ते बघून मग साधारणपणे शिक्षण शाखा ठरवू शकतो . तसेच आयुष्यात पुढे येणाऱ्या महादशा कोणते क्षेत्र सुचवते आहे ह्याचा सारासार विचार करून मग ठरवावे . जर चतुर्थ भावाचा उ. न स्वामी रवि असेल किंवा रवीच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे रवि ह्या ग्रहावरून ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या सबंधित शिक्षण होते . उदा . वैद्यकशास्त्र ( medical field ) , administration , politics , astronomy इ. उदा . आता समजा चतुर्थ स्थानाचा उ. न स्वामी रवि व मंगळ ह्यांच्याशी सबंधित असून १, ८, ५,१२ ह्या भावांचा कार्येश असेल व मेष , वृश्चिक , सिंह , मीन ह्या राशीचा प्रभाव असेल ( म्हणजे ह्या राशीत प्रामुख्याने ग्रह असतील ) ,तसेच पत्रिकेचा शैक्षणिक दर्जा पण चांगला असेल तर मग ' सर्जन' होण्यासाठी ती पत्रिका SUPPORTING आहे असे म्हणता येईल . एकदा जर वैद्यक शाखा निश्चित केली तर मग ग्रह , राशी भाव ह्याप्रमाणे मग आयुर्वेद , homeopathy , allopathy ह्या शाखा ठरवता येतात तसेच समजा allopathy नक्की झाले तर मग पुढील शिक्षण कोणते क्षेत्र दाखवते हे पण बघता येते . उदा . जर शुक्र, रवि,चंद्र , मंगळ हे ग्रह वृषभ ,मीन , वृश्चिक , मेष ह्या राशी व २, १२,८,१ हे भाव असतील तर मग डोळ्यांचे डॉक्टर (आय सर्जन ) होता येईल . जर चतुर्थ भावाचा उ. न स्वामी चंद्र असेल किंवा चंद्राच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे चंद्र ह्या ग्रहावरून ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या सबंधित शिक्षण होते . उदा . चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे तसेच जलपदार्थ , ताज्या भाज्या , वाहतूक , पाककला इ. गोष्टी चंद्रावरून बघतात त्यामुळे मानसशास्त्र , नेव्ही , शेती,नर्सिंग , सुगंधी द्रव्ये इ. क्षेत्र चंद्राच्या अधिपत्याखाली येतात . त्यामुळे Agriculture and food engg , dairy technology , pscyhology , bio- chemical , लहान मुलांचे शिक्षण क्षेत्र इ. गोष्टींसाठी चंद्र अनुकूल असतो . आता प्रत्येक क्षेत्र हे कोण्या एका ग्रहामुळेच ठरत नसून हे ग्रह , राशी भाव ह्यांचे combination बघावे लागते . उदा .psycology मध्ये चंद्र , बुध , गुरु हे ग्रह कर्क, मीन , मेष , मिथुन ह्या राशी आणि ४,३,१२ हे भाव ह्या सगळ्या गोष्टीं असाव्या लागतात . जर चतुर्थ भावाचा उ. न स्वामी मंगळ असेल किंवा मंगळाच्या नक्षत्रात असेल तर साधारण पणे मंगळ ह्या ग्रहावरून ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्या सबंधित शिक्षण होते . उदा. energy , power ,electricity , fire , जमीन etc . त्यामुळे प्रामुख्याने अभियांत्रिकी ( enggineering ) , मिलिटरी , बांधकाम , रवि पण असेल तर मग सर्जरी , पोलिस खाते इ. क्षेत्रासाठी अनुकूल असातो . एक उदाहरण द्यायचे झाल्यास electrical engineering करता मंगळा बरोबर बुधाचा विचार होतो तसेच मेष ,सिंह ,वृश्चिक ह्या राशी व ३, ८, ११ हे भाव महत्वाचे असतात . वर म्हटल्याप्रमाणे केवळ एक ग्रह ठराविक शाखेकरता कारणीभूत नसतो तर ग्रह ,राशी ,भाव ह्यांचे combination बघावे लागते व पुढे येणाऱ्या दशा ह्या सगळ्यांचा समग्र विचार करून मग दिशा ठरवता येते . बाकी ग्रहांबद्दलची माहिती पुढील भागात बघुयात . आता पत्रिकेतून शिक्षणासंबंधी विचार कसा करायचा ते बघू . ह्याबाबतीत मला कृष्णमुर्ती पद्धत जास्त प्रभावी वाटते . कृष्णमुर्ती पद्धती नुसार चतुर्थ स्थान,नवम स्थान व लाभ स्थान हे शिक्षणाच्या दृष्टीने बघितले जाते . चतुर्थ स्थानावरून साधारण पणे graduation पर्यंत च्या शिक्षणाचा विचार केला जातो नवम स्थानावरून उच्च शिक्षणाचा विचार होतो व लाभ स्थान हे सर्व प्रकारच्या लाभा करता विचारात घेतले जाते त्यामुळे शिक्षणाचा विचार करताना ४,९,११ हि महत्वाची स्थाने होत . तसेच ३,८ हि स्थाने शिक्षणाला विरोध करणारी किंवा अडथळे आणणारी आहेत .त्यामुळे साहजिकच ४,९,११ हि स्थाने कार्यान्वयित असणाऱ्या दशा शिक्षणाला पोषक व ३, ८ च्या दशा त्यामानाने अडचणी उत्पन्न करणाऱ्या असतात . चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी शिक्षणाच्या दृष्टीने विचारात घ्यावा लागतो . प्रथम पत्रिका बघताना शिक्षणाचा प्रश्न असेल तर चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बघावा तो रुलिंग मध्ये आहे का ते पाहावे . जर रुलिंग मध्ये असेल तर जन्मवेळ बरोबर आहे जर नसेल तर त्या उपनक्षत्र स्वामी च्या जवळचा ग्रह जो रुलिंग मध्ये आहे तो उ. न स्वामी म्हणून समजून त्याप्रमाणे जन्मवेळ शुद्ध करून घ्यावी . अशाप्रकारे जर २-४ मिनिटांचा जन्म वेळेत फरक असेल तर तो error काढता येतो . आता एकदा चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी ठरला कि मग तो ग्रह कोणता आहे ? कोणाच्या नक्षत्रात आहे ? कोणकोणत्या भावांचा कार्येश आहे . तसेच पुढे येणाऱ्या दशा कोणत्या दिशेच्या / क्षेत्राच्या दृष्टीने जास्त supporting आहेत हे बघून मग एक दिशा मिळू शकते . प्रत्येक ग्रहानुसार आणि पत्रिकेतील भावानुसार क्षेत्र ठरतात . त्यामुळे सर्वांचा तारतम्याने विचार करून तसेच मग ठरवता येते . आता कोणते ग्रह , भाव कोणती क्षेत्रे दाखवतात त्याचा विचार पुढच्या भागात करू . पत्रिकेतील रवीच्या स्थानावरून सर्वसाधारण सर्वसाधारण पणे जन्मवेळेचा अंदाज येतो किंवा किती वाजता जन्म आहे ह्यावरून रवि पत्रिकेत कोणत्या स्थानात असेल ह्याचा अंदाज बांधता येतो म्हणजे जर प्रथम रवि असेल तर सकाळी ६ ते ८ या दरम्यान जन्म असतो . व्यय स्थानी रवि असेल तर ८-१० या दरम्यान जन्म असतो . लाभ स्थानी रवि असेल तर सकाळी ८ ते १० या दरम्यान जन्म असतो.दशमस्थानी दशमस्थानीअसेल तर १० ते १२ दुपारी जन्म . नवम स्थानी असेल तर १२ते दुपारी २ मध्ये जन्म , अष्टमात असेल तर २-४ दुपारी जन्म , सप्तम स्थानी असेल तर ४-६ संध्याकाळी जन्म , षष्ठ स्थानात असेल तर संध्याकाळी ६-८ मध्ये जन्म , पंचमात असेल तर रात्री ८-१० मध्ये जन्म , चतुर्थात असेल तर रात्री १२-२ मध्ये जन्म , तृतीय स्थानात असेल तर २-४ रात्रीचा जन्म व द्वितीय स्थानात ४-६पहाटेचा जन्म असे अनुमान घेता येते . प्रथम स्थानात रवि असता : प्रतिकारशक्ती चांगली असते . भरपूर आत्मविश्वास असतो . समाजात मान असतो . द्वितीय स्थानात रवि असता : द्वितीय स्थान हे कुटुंब , धन स्थान आहे . ह्या स्थानावरून डोळे , घसा ह्या अवयव बघितले जातात . इथे रवि पापग्रहांबरोबर ( शनि,हर्शल,मंगळ , राहू )असेल तर डोळ्यांचे ,दातांचे किंवा घशाचे आजार असण्याची शक्यता असते . पापग्रहांबरोबरचा रवि आर्थिक नुकसान पण करतो . रवि-गुरु युती आर्थिक प्रगती दाखवते . तृतीय स्थानात रवि असता : हे पराक्रम स्थान आहे . इथे असणारा रवि पण आत्मविश्वास चांगला देतो . चतृर्थ स्थानात रवि असता : ह्या स्थानावरून ग्रुहसौख्य, मातृसौख्य , घर , गाडी , मृत्यू समयीची स्थिती इ. इतर ग्रहांच्या योगाप्रमाणे फळे मिळतात . पापग्रहांबरोबर असता चतुर्थ स्थानाची फारशी चांगली फळे मिळत नाहीत पंचम स्थानात रवि असता : ह्या स्थानावरून संतती , विद्या ,कला,उपासना इ. गोष्टी बघतात. ह्या स्थानातील रवि पापग्रहांच्या योगात नसता संतती सुखास चांगला असतो . षष्ठ स्थानात रवि असता : ह्या स्थानावरून आजार, मातुल घराणे , नोकरी इ. बघतात. रवी हा सरकारी नोकरीचा कारक ग्रह आहे त्यामुळे बर्याच वेळा अशा नोकरीत अधिकार योग देतो . ह्या स्थानावरून आजारपण बघितले जाते त्यामुळे रवि पापग्रहांच्या युतीत , केंद्रयोगात किंवा प्रतियोगात असता त्या ग्रहांप्रमाणे आजाराचे स्वरूप ठरते . उदा . रवि- मंगळ युती हाडे मोडणे किंवा उष्णतेचे विकार देऊ शकते . सप्तम स्थानात रवि असता : ह्या स्थानावरून जोडीदार , विवाह , धनद्यातील भागीदार इ.बघतात . जोडीदार मानी असतो . बर्याच वेळाग्रहांबरोबर असलेला रवि वैवाहिक सौख्य देत नाही विशेषत: बायाकांच्या पत्रिकेत रवि , मंगळ पापग्रहांच्या योगात असतील तर वैवाहिक सौख्य फारसे चांगले नसते . अष्टम स्थानात रवि असता : प्रतिकार शक्ती कमी असते . बर्याच वेळा अष्टमातील ग्रह बर्याच वेळा मनस्ताप देतात . सरकार दरबारी SUPPORT न करणारा इथला रवि आहे . नवम स्थानात रवि असता : हे भाग्य स्थान आहे तसेच परदेश गमन पण ह्या स्थानावरून बघतात . हे स्थान रवीच्या दृष्टीने सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यात मदत करणारे आहे . दशम स्थानात रवि असता : हे स्थान रविकरता एक शुभ स्थान आहे . इथला रवि नोकरीत विशेषत: सरकारी नोकरीत चांगला हुद्दा आणि मान असतो . सत्त्तेत असणार्यांन करता पण हा रवि शुभ फले देतो . एकादश / लाभ स्थानात रवि असता : एकंदरच लाभातील ग्रह आर्थिक दृष्ट्या शुभ फळे देतात . लाभ स्थानातील रवि आर्थिक लाभास चांगला . इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा आहे . व्यय / द्वादश स्थानात रवि असता : इथला रवि पाप ग्रहांच्या योगात असेल तर आर्थिक नुकसान , डोळ्यांचे त्रास आणि बंधनयोग देणारा आहे . आपण गुरूची स्थानगत फले बघुयात . प्रथम स्थानी गुरु असता : प्रथम स्थानी गुरु असता त्याची दृष्टी ५,७,९ ह्या स्थानावर पडते . त्यामुळे अनुक्रमे संतती , विवाह , भाग्य ह्या स्थानावर गुरूची शुभ दृष्टी येते .प्रथम स्थानी असणारा गुरु व्यक्तीस स्थूल बनवतो . तसेच गोरा रंग असणे हे पण गुरूचेच फल आहे . ह्या स्थानातील गुरु समाजिक कार्याची आवड निर्माण करतो . द्वितीय स्थानी गुरु असता : द्वितीय स्थान हे कुटुंब स्थान आहे तसेच धन स्थान पण आहे . ह्या स्थानातील गुरु मोठ्या कुटुंबात जन्म दाखवतो . पैशांच्या दृष्टीने गुरु आर्थिक स्थिती चांगली ठेवतो . द्वितीय स्थानातील ग्रहांवरून कोणत्या पदार्थांची आवड आहे हे समजते . गुरु मुळे गोड पदार्थ खाण्याची आवड असते . तृतीय स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून भावंडे, लिखाण इ. ह्या स्थानात गुरु असता त्याची दृष्टी विवाह व लाभ स्थानावर पडते जी ह्या दोन्ही स्थानाच्या दृष्टीने शुभ असते . ह्या स्थानातील गुरु अभ्यासू वृत्ती देतो तसेच घरात पण ह्या व्यक्तींना महत्व असते . अक्षर गुरूमुळे सुंदर असण्याचीअसण्याची पण शक्यता असते . भावंडे जास्त असतात . अर्थात आजकाल ' एक या दो बस ! ' असे असताना ह्या गुरूच्या फलाच पडताळा येणे कठीण ! हे छोट्या प्रवासाचे स्थान आहे त्यामुळे असे प्रवासास गुरु चांगला . चतुथ स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून ग्रुहसौख्य, मातृसौख्य , घर , गाडी , मृत्यू समयीची स्थिती इ. विचार करतात . ह्या स्थानातील गुरु मातृ सुख , गृहसौख्य चांगले देतो . शुक्रा बरोबर असेल तर वाहन सौख्य पण छान असते . अशुभ ग्रहांच्या योगातील गुरु हे सगळ्या सुखात बाधा आणतो . पंचम स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून संतती , विद्या इ. गोष्टी बघतात . ह्या स्थानातील गुरु संतती सुखास तसेच शिक्षणाला चांगला असतो . तसेच उच्च शिक्षणाला पोषक असतो . इथला गुरु कोणताही अभ्यास सातत्याने करण्याची वृत्ती देतो . बर्याच शिक्षकांच्या पत्रिकेत पंचमात गुरु असतो . षष्ठ स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून आजार, मातुल घराणे , नोकरी इ. बघतात . इथे गुरु असता मातुल घराण्याची ( मामा, मावश इ. ) आर्थिक स्थिती चांगली असते . इथे बिघडलेला गुरु अपचन , पोटाचे आजार ,रक्तविकार , रक्त दोष डायबेटीस , यकृत ( लिव्हर ) इ. चे आजार होऊ शकतात . सप्तम स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून जोडीदार , विवाह , धनद्यातील भागीदार इ. बघतात वैवाहिक सौख्यास इथे गुरु चांगला असतो .बायकांच्या पत्रिकेत चंद्र किंवा गुरु बरोबर असलेला गुरु वैवाहिक सुखास चांगला परंतु पाप ग्रहांबरोबर असलेला वाईटच . पुरुषांच्या पत्रिकेत असा शुभ योगातील गुरु पत्नी सुशिक्षित व सुस्वभावी देतो . अष्टम स्थानी गुरु असता : हे मृत्यू स्थान आहे . इथला एकटा गुरु शांत मरण दाखवतो. तसेच हे बायकोचे धनस्थान आहे . त्यामुळे बायकोकडून संपतिक लाभ होतात. नवम स्थानी गुरु असता : हे भाग्य स्थान आहे . तसेच उच्च शिक्षणाचे स्थान आहे . इथल्या गुरु मुळे व्यक्तीची वैचारिक बैठक चांगली असते . उच्च शिक्षणासाठी हा गुरु अतिशय चांगला .स्वकष्टावर आयुष्यात यशस्वी होतात . अध्यात्माच्या दृष्टीने पण हा गुरु शुभ फले देतो . परदेश गमानासाठी पण नवम स्थान विचारात घेतले आहे . त्यामुळे इथला गुरु बर्याच वेळा शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी देतो. तसेच धार्मिक स्थळांना भेटी देणे , सामाजिक कार्य करणे इ. गोष्टींकडे कल असतो . दशम स्थानी गुरु असता : हे स्थान कर्म स्थान आहे . पारंपारिक ज्योतिष शास्त्रात वडिलांचा विचार ह्या स्थानावरून केला आहे . हा गुरु बौद्धिक क्षेत्रात व्यवसाय / नोकरी दाखवतो . तसेच उत्तम नाव लौकिक ,मान गुरूमुळे मिळते . गुरु पितृसुख पण चांगले देतो . एकंदर दशमातील शुभयोगातील गुरु चांगलाच असतो . लाभ स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून मित्रमंडळ , सर्व प्रकारचे लाभ इ. बघतात . इथे गुरु असता चांगले सुसंस्कृत , सुशिक्षित मित्र देतो . लाभतील गुरु आर्थिक दृष्ट्या पण चांगला .तसेच गुरूची सातवी दृष्टी पंचमावर असल्याने त्या दृष्टीने पण म्हणजे संतती सुखास चांगला असतो . व्यय स्थानी गुरु असता : ह्या स्थानावरून परदेश प्रवास ,मोक्ष त्रिकोणातील स्थानामुळे पारमार्थिक उन्नती वगेरे बघतात . इथला गुरु त्यामुळे पारमार्थिक उन्नती, अध्यात्म साठी चांगला , हा गुरु परदेश प्रवास पण घडवून आणतो . साधारण साधारणपणे गुरु चर राशीत असता ( मेष,कर्क,तुल,मकर ) परदेशात थोड्य काळाकरता वास्तव्य असते . द्विस्वभाव राशीत असता (मिथुन, कन्या,धनु,मीन ) परदेशात मध्यम काळाकरता वास्तव्य असते . स्थिर राशीत गुरु असता ( वृषभ सिंह , वृश्चिक, कुंभ ) परदेशात दीर्घ काळाकरता वास्तव्य असते . हर्षलची ढोबळमानाने फळे खालील प्रमाणे आहेत . प्रथमस्थानी हर्षल असता थोडा विक्षिप्त स्वभाव असण्याचा संभाव असतो . द्वितीयस्थानी हर्षल असता अचानक उद्भवणारे खर्च किंवा आर्थिक संकटे येऊ शकतात . तसेच ह्यास्थानातील हर्षल असणाऱ्या व्यक्ती बोलण्यात फटकळ असण्याची शक्यता असते . तृतीयस्थानी हर्षल असता उत्तम आकलन शक्ती , स्मरणशक्ती असते . चतुर्थस्थानी हर्षल असता मातृसौख्य व गृहसौख्य चांगले मिळत नाही बर्याच वेळा भांडणे होण्याचा संभाव असतो . पंचम स्थानी हर्षल असता बुद्धिमत्तेच्या दृष्टीने चांगला असतो . प्रथम व नवम स्थानी बुध , गुरु सारखे ग्रह असतील तर आकलन शक्ती व बुद्धिमत्ता चांगली असते . बायकांच्या पत्रिकेतील हर्षल abortions , delivery च्या वेळेस काही त्रास दाखवतो . षष्ठ स्थानी हर्षल असता अचानक उद्भवणारे आजार दाखवतो . कोणत्या ग्रहाच्या योगात हर्षल आहे त्यावर आजार अवलंबून असतो . उदा . मंगळा बरोबर असता उष्णतेचे विकार ,भाजणे ,मूळव्याध इ. सप्तम स्थानी हर्षल असता वैवाहिक सुखाला फारसा चांगला नसतो . विवाह ठरण्यात अडथळे येतात . ठरलेले लग्न मोडणे हा पण प्रकार होतो . अष्टम स्थानी हर्षल असता अकस्मात मृत्यू येण्याची शक्यता असते . नवम स्थानी हर्षल असता प्रदेश प्रवासाचे योग येतात . बर्याच वेळा ज्या माणसाना परदेश प्रवास करावा लागतो ( frequent flyer ) अशा लोकांच्या पत्रिकेत ह्या स्थानी हर्षल असण्याची शक्यता जास्त असते . दशम स्थानी हर्षल असता बर्याच वेळा नोकरी/ व्यवसायात बदल होतात . शुभ ग्रह योगात असणारा हर्षल व्यवसायात चांगली प्रगती दाखवतो तर अशुभ ग्रह योगात असणारा हर्षल व्यवसायात/ नोकरीत अडचणी दाखवतो. एकादश स्थानी हर्षल असता मित्रांशी पटत नाही . आर्थिक बाबतीत स्थिरता देत नाही . द्वादश स्थानी हर्षल पाप ग्रहांबरोबर असता वाईटच असतो . भांडणे ,मारामाऱ्या होण्याचा तसेच समाजात नाव खराब होण्याची शक्यता असते . वर दिलेली सर्व हर्षलाची स्थानगत फळे ढोबळ मा सूचक स्वप्ने पडणार्यांच्या पत्रिकेत पण नेपच्यून प्रभावी असतो. प्रथम स्थानातील नेपच्यून व्यक्तीस भावनाप्रधान बनवतो . द्वितीय स्थानात असता गूढ मार्गाने धनार्जन , तृतीय स्थानी असता उत्तम कल्पना शक्ती देतो लेखक किंवा कवींच्या पत्रिकेत तृतीयातील नेपच्यून त्या विषयात उत्तम प्रगती दाखवतो . चतुर्थ स्थानात पाप ग्रहांबरोबर असता गृहसौख्य देत नाही . पंचमात नेपच्यून असेल तर सूचक स्वप्ने पडणे ( intuition ) ह्याची शक्यता जास्त असते. पंचमात नेपच्यून असणाऱ्या व्यक्ती खूप भावनाप्रधान असतात .तसेच नेपच्यून हा गुढतेशी संबंधित ग्रह असल्याने पंचमात असता पंचम हे विद्या स्थान असल्यामुळे गूढ विषयाचा अभ्यास पण करण्याकडे कल असतो उदा . ज्योतिष , तंत्र मंत्र विद्या , जादू इ . शुक्र- नेपच्यून शुभ योग हे कलेत प्रगती दाखवतात . नेपच्युन वेगवेगळ्या music instruments शिकण्यात विशेष करून तंतू वाद्य म्हणजे गिटार ,सतार , व्हायोलीन इ.पंचमातील नेपच्यून उच्च प्रतिभाशक्ती देतो . षष्ठ स्थानातील नेपच्यून गूढ , अनाकलनीय आजार देण्याची शक्यता असते . सप्तमातील नेपच्यून इतर कुयोग असता वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने फारसा चांगला नाही . अष्टमात असता गूढ मरण येण्याची शक्यता असते म्हणजे कशामुळे मरण आले ते काळातच नाही . चुकीच्या औषधामुळे येणारे मरण , विषप्रयोगामुळे , गुदमरून मरणे इ. गोष्टी यात होतात . नवम स्थानातील नेपच्यून जलप्रवास दाखवतो . आजकाल लोक विमान प्रवास करत असल्याने समुद्रावरून प्रवास असे म्हणता येईल . थोडक्यात म्हणजे 'परदेशप्रवास ' .तसेच नवमातील नेपच्यून जर गुरूशी नवपंचम योग करत असेल तर चांगल्या प्रकारची अध्यात्मिक प्रगती दाखवतो . इथला नेपच्यन गूढ शास्त्र अभ्यासाला पण चांगला असतो . दशमस्थानातील नेपच्यून सर्वसाधारण पणे इथला नेपच्यून ह्या ग्रहावरून पहिले जाणारे व्यवसाय दाखवतो . उदा मनोसोपचार तज्ञ , जादुगार, ज्योतिषी , कलाकार इ. अर्थात त्यासाठी पत्रिकेतील इतर योग पण पोषक असावे लागतात . एकादश / लाभ स्थानातील नेपच्यूनला हे स्थान फारसे चांगले नाही मैत्रीत किंवा आर्थिक लाभत फसवणूक होऊ शकते . व्यय स्थानातील नेपच्यूनला सुद्धा हे स्थान तितकेसे चांगले नाही . बाकी पत्रिका बिघडली असल्यास शारीरिक त्रास , गुन्हेगारी, लबाड लोकांकडून त्रास दाखवतो . कोणताही ग्रह हा त्याच्या दशेत किंवा अंतर्दशेत तो ज्या स्थानी आहे त्या संबंधी फल न देता त्याचा नक्षत्र स्वामी जिथे आहे व त्या नक्षत्र स्वामीच्या राशी जिथे आहेत त्याची प्रामुख्याने फले देतो " . Sheet3